वाशिम - कारंजा तालुक्यातील बुद्रुक ते भिवरी रस्त्यादरम्यान दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
![washim accident news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8485094_washim.jpg)
कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ते भिवरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुभाष टाके (वय-62) आणि प्रताप मोहिते (वय-30) या दोघांचा मृत्यू झाला असून अभिजित टाके गंभीर जखमी झाला आहे.
दुचाकीची बैलाला धडक
तर दुसरा अपघात लाडेगाव ते कामरगाव रस्त्यावर घडला असून दुचाकीने बैलाला दिलेल्या धडकेत प्रांजल गजभिये (वय -27) यांचा जागीच मृत्यू झालाय. अमोल सवई (वय-36) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.