वाशिम- जिल्ह्यात तापमान वाढत असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगली पशु , प्राणी पाण्यासाठी भटकत आहेत. अशातच वाशिम जिल्ह्यातील वाघी खुर्द शेतशिवारात तीन रोही विहिरीत पडल्याची घटना घडली.
रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द गावातील शेख दादूमिया यांच्या शेतातील विहिरीत पाण्याच्या शोधात असलेले तीन रोही विहिरीत पडल्या. दादूमिया यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना देऊन गावकऱ्यांच्या मदतीने त्या रोहिंना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश न आल्याने त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी सात तास शर्थीचे प्रयत्न करून त्या तिन्ही रोहिंना विहिरीतुन बाहेर काढले.