वाशिम - कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस मांडला असून शहरातील एका बालकाला मोकाट कुत्र्याने (Attacking Dogs) जीवघेना हल्ला केला आहे. या हल्ल्यात बालकाच्या (Dogs attack young children) हाताच बोट तोडून जखमी केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे. या हल्ल्यात इतर कुत्रेही तुटून (Dogs attack young children In Vashim District) पडल्याने मुलगा जखमी झाला आहे.
नागरिकांकडून संताप व्यक्त
शहरातील महाराणा प्रताप चौक, अस्ताना चौक, जीजामाता चौक, महाविर चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौकात मोकाट कुत्र्यांचे जत्थेचे जत्थे फिरताना दिसत आहेत. याचा त्रास दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नगरपालिकेला बंदोबस्त करता आलेला नाही
मोकाट कुत्र्यांबद्दल वेळोवेळी चर्चा होते आणि ती हवेतच विरते. त्या चर्चेची काहीच फलनिष्पत्ती निघत नाही. चर्चेचे गुर्हाळ चर्चेतच संपते. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र अद्याप मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आलेला नाही.
कुत्र्यांचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्याची मागणी नागरिकांची मागणी
शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. आज झालेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यासारखी एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासनासमोर आंदोलन वगैरे केले जाते. त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रशासन संतप्त नागरिकांना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देते. नंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत असते. अशा कुत्र्यांचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.
हेही वाचा - Lata Mangeshkar Covid Positive : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर;कुटुंबाने दिली माहिती