वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाची वेळ सकाळी 8 ते 12 पर्यंत आहे.याचाच फायदा घेत रिसोड शहरातील जिजाऊ डेली निड्सचे शेटर तोडून दुकानातील 15 हजार रोख रक्कम आणि किमती सामान चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सांयकाळी 5 वाजता घडली.
आज सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार मालकाच्या लक्षात येताच त्याने पोलिसांत तक्रार दिली. चोर दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला असून,या फुटेज आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान रिसोड पोलिसांसमोर आहे.
लॉकडाऊन काळात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.