केपटाऊन SA vs PAK 2nd ODI Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा वनडे सामना आज म्हणजेच 19 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स इथं खेळवला जाणार आहे.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 17, 2024
An entertaining first ODI concludes.
🇵🇰Pakistan win by 3 wickets in Paarl.
Our Proteas will bounce back in Cape Town on Thursday!👊🏔️🏏#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/zRWAoXMV6M
T20 मालिकेत यजमान आफ्रिकेचा विजय : दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला. यजमानांनी सेंच्युरियन T20I मध्ये पाहुण्यांना सात गडी राखून पराभूत करण्यापूर्वी सलामीचा T20 सामना 11 धावांनी जिंकला होता. तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 सामना पावसामुळं रद्द झाला.
पहिल्या वनडेत काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्ताननं यजमान दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 239 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताननं 49.3 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठलं. यासह पाहुण्या संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा वनडे सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेची नजर मालिकेत बरोबरी करण्याकडे असेल. तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
4️⃣5️⃣ overs down.
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 17, 2024
🇵🇰Pakistan are 212/7, with 28 more runs needed.
Just the 3 more wickets needed to secure the " w" for our proteas!🫡#WozaNawe#BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/p0eU7NqCW8
तीन वर्षांपूर्वी मालिका विजय : यापुर्वी पाकिस्ताननं 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यात पाहुण्या पाकिस्ताननं 2-1 नं मालिका जिंकली होती. तर त्यापुर्वी म्हणजेच जानेवारी 2019 मध्ये शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवला होता. आता मालिकेतील पहिला सामान जिंकल्यानं पाकिस्तानकडं आजचा दुसरा सामना जिंकत 3 वर्षांनी मालिका जिंकण्याची संधी आहे.
Some local support from one of our Blitzboks players, Dewald Human, at tonights game.🏉🇿🇦#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/huKnMO04jR
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 17, 2024
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका वनडे फॉरमॅटमध्ये 84 वेळा आमनेसामने आले आहेत. या 83 वनडे सामन्यांपैकी 31 पाकिस्ताननं जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनं 52 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसरा वनडे सामना आज 19 डिसेंबर (गुरुवार) रोजी संध्याकाळी 5:30 वाजता न्यूलँड्स, केपटाऊन इथं सुरु होईल, याची नाणेफेक संध्याकाळी 05:00 वाजता होईल.
Post-match interactions in Paarl following Pakistan's victory in the first ODI against South Africa. 🤝#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/fHrYfdtFix
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 18, 2024
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान दुसऱ्या वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं आणि कसं पहावं?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान वनडे मालिकेसाठी भारतातील अधिकृत प्रसारक व्हाया डॉट कॉम 18 आहे. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला वनडे सामना थेट प्रक्षेपण पाहण्याचा पर्याय स्पोर्ट्स18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर उपलब्ध असेल. तथापि, भारतात पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
Saim Ayub's brilliant 1⃣0⃣9⃣ and Salman Ali Agha's unbeaten 8⃣2⃣* guided Pakistan to a 3-wicket win in the first ODI 🏏#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/Nb5YswNM9C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 17, 2024
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, तय्यब ताहिर, सलमान आगा, मोहम्मद रिझवान (कर्णधार/ यष्टिरक्षक), शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, अबरार अहमद
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, क्वेना माफाका, केशव महाराज.
हेही वाचा :