ETV Bharat / state

बँकेचा अजब कारभार; खात्यावर एक हजार रूपयेही नसलेल्या खातेदाराला केले 'लखपती' - imran khan

बँकेच्या गलथान कारभारामुळे एक हजार रूपयेही नसलेल्या खातेदाराच्या खात्यात तीन लाख रूपये ऐन नोटाबंदीच्या काळात जमा झाले आणि परस्पर काढण्यातही आले.

घुगे दाम्पत्य
author img

By

Published : May 12, 2019, 8:57 AM IST

Updated : May 12, 2019, 11:58 AM IST

वाशिम - मालेगाव येथील छोटे हॉटेल व्यावसायिक असलेले दिलीप घुगे व त्यांची पत्नी सुनंदा दिलीप घुगे यांना 'दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँके'च्या मालेगाव शाखेने लखपती दाखविले आहे. त्यांच्या संयुक्त खात्यात बँकेने तब्बल 3 लाख रुपये जमा केले. एवढेच नाही, तर याशिवाय शेती नसतानाही त्यांच्या खात्यात गारपीट नुकसानीचे 9 हजार रुपयेही जमा झाल्याचे दिसते.

बँक अधिकारी आणि दिलीप घुगे

दिलीप घुगे यांनी गॅस सबसिडीसाठी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मालेगाव शाखेत खाते उघडले. सबसिडीचे पैसे जमा झाले का? हे पाहण्यासाठी ते बँकेत गेले. त्यांनी पासबुक देऊन पासबुकवर नोंदी करून घेतल्या. यानंतर घरी जाऊन पासबूक पाहिल्यानंतर तर त्यांना धक्काच बसला. 2017 च्या नोटाबंदी काळात त्यांच्या खात्यावर चक्क तीन लाख रुपये जमा झाले होते. असे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, आपल्या खात्याची प्रत्यक्षात तपासणी केली, तेव्हा त्यात हजार रूपयांपेक्षाही कमी पैसे असल्याचे त्यांना दिसून आले.

Intro:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील छोटे हॉटेलं व्यावसायिक असलेल्या दिलीप घुगे व त्यांची पत्नी सौ सुनंदा दिलीप घुगे यांच्या दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मालेगाव शाखेतील संयुक्त खात्यामध्ये 3 लाख रुपये व त्यांच्याकडे शेती नसताना गारपीट नुकसानीचे 9 हजार रुपये जमा झाल्याचे पासबुक मध्ये इन्ट्री दिसताच त्यांना मनस्ताप झालय.

दिलीप घुगे यांनी गैस सबसिडी साठी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मालेगाव शाखेत खाते उघडले व सबसिडीचे पैशे जमा झाले का हे पाहण्यासाठी ते बँकेत गेले आणि त्यांनी पासबुक देऊन पासबुकवर इन्ट्री करून घेतली.घरी येऊन पाहिलं तर त्यांचे ह्रदयाचे ठोकेच वाढले त्यावेळेस म्हणजे 2017 नोटबंदीचं काळात आणि अचानक आपल्या खात्यात 3 लाख जमा झाले असल्याचे पासबुक वरील इन्ट्रीमुळे समजले मात्र त्यांनी आपलं खाता चेक केलं तर त्या मध्ये हजार पेक्षाही कमी पैसे दिसले.

Body:घुगे यांचे संयुक्त खाते क्रमांक 1009928-20128151 दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मालेगाव येथे आहे.घुगे याना ही घटना काढल्यानंतर त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते की आपल्या खात्यात नोट बंदी दरम्यान एवढी मोठी रक्कम टाकण्यात आली तरी कशी आणि टाकली तरी कोण पण त्यांनी जेव्हा आपले खाते चेक केले तर खात्यात एक हजार पेक्षाही पैसे कमी होते..

Conclusion:या संदर्भात बँकेतील कर्मचाऱ्याने पासबुक वर चुकीने दुसऱ्याची इन्ट्री घुगे यांच्या पासबुकवर केल्याने घुगे यांच्या खात्यात ती रक्कम जमा झाल्याची दाखवल्या गेली असल्याचे शाखाधिकारी बी एस जाधव यांनी सांगितलंय मात्र या बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नजर चुकी मुळे छोटे हॉटेल व्यवसायिकाला नाहक झालेल्या मनस्ताप याला जबाबदार कोन ? त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

बाईट : बी एस जाधव ( शाखाधिकारी मालेगाव )
बाईट : दिलीप घुगे
Last Updated : May 12, 2019, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.