ETV Bharat / state

ग्रामपंचायत नसलेले गाव! पांघरी गावाला पंचायत समिती अकोल्याची तर तालुका वाशिमचा - पांघरी ग्रामपंचायत न्यूज

वाशिम जिल्ह्यातील पांघरी गावाला त्याच्या स्थापनेपासून ग्रामपंचायत मिळालेली नाही. गावात ग्रामपंचायत असावी यासाठी नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र, अद्याप त्याला यश मिळालेले नाही.

Panghari village gram panchayat news
पांघरी ग्रामपंचायत न्यूज
author img

By

Published : Mar 13, 2021, 10:33 AM IST

वाशिम - अपेक्षित लोकसंख्येचा निकष पूर्ण केला की, कुठल्याही गावाला ग्रामपंचायत स्थापन करण्यास परवानगी मिळते. मात्र, वाशिम जिल्ह्यात एका गावाला ग्रामपंचायतच नाही. पांघरी असे या गावाचे नाव असून त्यांची पंचायत समिती अकोला जिल्ह्यात तर तहसील कार्यालय वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरमध्ये आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध कामांसाठी दोन जिल्ह्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. लवकरात लवकर गावाला ग्रामपंचायतचा दर्जा द्या किंवा एखाद्या गट ग्रामपंचायतमध्ये समावेश करून घ्या, अशी मागणी पांघरीचे ग्रामस्थ करत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील पांघरी गावाला ग्रामपंचायत नाही

22 वर्षांपासून ग्रामपंचायतीची मागणी -

अकोला जिल्ह्यातून विभाजनकरून 1998ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील पांघरी हे गाव वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून या गावाला ग्रामपंचायत नाही. गावातील नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजपर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. त्यामुळे गावाचा विकास झाला नाही. शासनाकडून गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, गावाला ग्रामपंचायतच नसल्याने विकास निधी खर्च कसा करावा याचे नियोजनच होत नाही.

शासकीय कामांसाठी होतो मनस्ताप -

पांघरी येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतात. मात्र, गेल्या 22 वर्षांपासून गावात ग्रामपंचायतची निवडणूक झालीच नाही. त्यामुळे गावात शासकीय योजना राबवल्या जात नाहीत. त्यांची पंचायत समिती अकोला जिल्ह्यात तर तहसील कार्यालय वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरमध्ये असल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गावाला लवकरात लवकर स्वतंत्र ग्रामपंचायत द्या किंवा एखादया जवळच्या गट ग्रामपंचायतला जोडा अशी मागणी, ग्रामस्थ करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.