वाशिम - वाशिम जिल्ह्याचा शेजारी जिल्हा असलेल्या अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये बस सेवा सुरू आहे, मात्र या बसमध्ये प्रवासी प्रचंड गर्दी करत असून, कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकोल्याहुन रिसोडला जाणाऱ्या बसमध्ये एका सीटवर तीन -तीन प्रवासी बसत आहेत. ज्या प्रवाशांना जागा मिळाली नाही असे प्रवासी बसमध्ये उभा राहून प्रवास करत आहेत. बसमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. बसमधील अनेक प्रवाशांनी मास्क देखील घातलेले नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये देखील असेच चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - जामनेरमध्ये कोविडपेक्षा गैरसोई भयंकर, कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळाले