ETV Bharat / state

वाशिम : शेततळ्यात बूडून दहा वर्षीय मूलाचा मृत्यू - वाशिम ताज्या बातम्या

आज वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथे 10 वर्षीय मुलाचा शेततळ्यातील पाण्यात बूडून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

ten-year-old boy drowns in farm lake in washim
वाशिम : शेततळ्यात बूडून दहा वर्षीय मूलाचा मृत्यू
author img

By

Published : Jan 5, 2021, 7:14 PM IST

वाशिम - 10 वर्षीय मुलाचा शेततळ्यातील पाण्यात बूडून मृत्यु झाल्याची घटना आज वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथे घडली आहे. गौतम अणील वाठोरे असे या मुलाचे नाव असून तो पोहण्यासाठी शेततळ्यात गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाला मृतदेह बाहेर काढायला एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर यश आले.

दरम्यान, जालना येथील इब्राहिमपूरमधील एका तरुणीचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची देखली घटना घडली आहे. पूजा सिधुसिंग डोभाळ (२०) ही बीडीएसच्या द्वितीय वर्षात औरंगाबाद येथे शिकत होती. टाळेबंदीनंतर ती घरीच होती. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शेत तलावावर गेली होती. तलावावरून चालत असताना पूजाचा पाय घसरला आणि ती शेततळ्यात पडून मृत्यू झाला.

हेही वाचा - 'किसान रेल्वे' योजनेच्या लाभापासून मराठवाड्यातील शेतकरी वंचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.