वाशिम - विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा बंद करून धरणे आंदोलन करण्यात आले. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
उच्च माध्यमिक घोषित आणि अघोषित शाळांना अनुदानाचा शासनाचा निर्णय काढून शिक्षकांना पगार सुरू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एक दिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आले. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन केले. शासनाने वेळीच दखल घेऊन मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले.