वाशिम- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. भारतात याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ नये शासन विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लढत आहेत. या सर्वांच्या कार्याला दिगंबर घोडके या शिक्षकाने शाहिरी पोवाड्यातून सलाम केला आहे.
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंग राखावे, मास्क परिधान करावा, असा संदेश देत अत्यावश्यक सेवेतील सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोवाडा वाशिम जिल्ह्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षक दिगंबर घोडके यांनी सादर केला.
कोरोनाच्या महामारीला मानव जातीतून हद्दपार करण्यासाठी झटणाऱ्या सर्व यंत्रणाविषयी आपल्या मनात आदर असावा. संकटाच्या काळात माणसांनी माणुसकीचे दर्शन घडवावे आणि निसर्गाचा ऱ्हास होईल असे वर्तन करु नये, अशी भावना पोवाड्यातून व्यक्त करण्यात आली आहे.