वाशिम - शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क धरणात उतरून आंदोलन केले. जोपर्यंत महावितरण शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
हेही वाचा - Hindu Muslim Unity : वाशिम कारागृहात 32 हिंदू - मुस्लिम कैद्यांनी ठेवले रोजे
जऊळका, कुत्तरडोह, अमानवडी येथे विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले पीक विजेअभावी जळून जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकवेळा महावितरण कार्यालय गाठून आपल्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्याय मिळाला नाही म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क धरणात उतरून आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत महावितरण शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा - श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त भव्य यात्रा