वाशिम- वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील नावली येथील आकाश गणेश राऊत हे शेतातून बैल गाडी घेऊन घरी परतत असताना. खिशात (MI) कंपनीच्या रेडमी मोबाईलचा अचानक स्फोट झाला. आकाश राऊत यांच्या लक्षात येताच खिशातील मोबाईल त्यांनी फेकून दिला.
आठ हजार रुपयाचे नुकसान
घटनास्थळी उपस्थित असणारे पोलीस जमादार दामोधरईप्पर,रुपेश बाजड पाटील यांनी पेट घेतलेल्या मोबाईलवर पाणी टाकुन विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु मोबाईल पुर्णपणे खराब जळाला होता. शेतकऱ्याच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यामध्ये शेतकरी आकाश गणेश राऊत यांचे आठ हजार रुपयाचे नुकसान झाले.
शेतक-याच्या सर्तकतेमुळे अनर्थ टळला
काही काळात मोबाईलचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकांना या अपघातात गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र मोबाईल स्फोट झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा - वाशिम काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात आंदोलन; अदानी, अंबानी यांचे घर भरल्याचा आरोप