वाशिम - झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे राज्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानं, आस्थापना कडकडीत बंद आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून पोलीस दंड वसूल करत आहेत.
वाशिम शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस शहरामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दोन दिवसांमध्ये वैध कारणाशिवाय नागरीकांनी बाहेर पडू नये. बाहेर पडणाऱ्या नागरीकांकडे ते कुठल्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, याबाबतचा पुरावा असायला पाहीजे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
वीकेंड लॉकडाऊनचे नियम अधिक कठोर असून, काल रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन सुरू झालेला आहे. जिल्ह्यासह राज्यात आज आणि उद्या कडक लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा प्रत्यक्ष फिल्डवर उतरली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा - फॅमिली प्लॅनिंग केले असते तर लसीचा तुटवडा जाणवला नसता -उदयनराजे