वाशिम - हिंगोली येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील दोन जण देपूळ (वाशिम) येथे आले होते. त्यामुळे देपूळ येथे सहा जण होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कामरगाव येथे कार्यरत परंतू अमरावती येथे राहणारे मुख्याध्यापक कोरोनाबाधित असल्याचे 21 एप्रिलला अमरावतीत स्पष्ट झाले. हे मुख्याध्यापक 2 एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातील कामरगांव येथे तांदूळ वाटप करण्यासाठी आले होते. तेव्हा ते 200 विद्यार्थ्यांसह 5 शिक्षकांच्या संपर्कात आले होते. त्यात तीन शिक्षक व दोन नागरिक अशा एकूण पाच जणांना वाशिम येथे अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.