वाशिम - नगर परिषदेच्या आवारात दुपारच्या सुमारास गव्हाळ जातीचा नाग आढळल्याने एकच खळबळ उडाली. नगर परिषदेच्या परिसरातच नाग दिसल्याने नागरिक भयभीत झाले होते.
हेही वाचा - आलिया गावात अजब वरात.... हेलिकॉप्टरने थेट वधूच्या दारात!
परिसरातील सर्पमित्र मनोज इंगळे यांना ही माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेत या नागाचा शोध घेतला असता त्या परिसरात गव्हाळ तपकिरी रंगाचा अति विषारी नाग असल्याचे सर्पमित्राच्या निदर्शनास आले. ४ फूट लांब आणि विषारी नागाला शिताफीने पकडून सर्पमित्र इंगळे यांनी वनविभागाच्या हद्दीत सोडून जीवदान दिले.
हेही वाचा - हरियाणा : कुरुक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला उद्यापासून सुरुवात