वाशिम - जिल्ह्यातील धोडप येथील संदीप बकाल हा युवक 26 नोव्हेंबरला बेपत्ता असल्याची तक्रार रिसोड पोलिसात दिली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह असेगाव येथे पैनगंगेत मिळाला. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली असता, हा खून त्याच्याच सख्खा लहान भाऊ आणि त्याच्या तीन मित्रांनी केला असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - कल्याण-डोंबिवली दरम्यान आज 5 तासाचा मेगाब्लॉक, लांबपल्ल्याच्या फेऱ्या रद्द
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बकाल हा व्याजाचा व्यवसाय करत होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर काही दिवसात त्याचा मृतदेह पैनगंगेत मोटारसायकलला बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, मारेकरी घरचेच निघाले.
मृत हा महिलांना त्रास देत असल्यानेच त्याच्या भावाने त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.