ETV Bharat / state

माटोंकार्लो कंन्स्ट्रक्शन विरोधात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन - shivsena rasta roko agitation

रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे अनेकांचे अपघात होवून नागरिक जखमी होत आहेत. तर माटोंकार्लो कंपनीच्या वाहनाने एक महिला व एक पुरूषाचा बळी घेतला होता. त्यांच्या न्याय मागणीसाठी बुधवारी दि. २३ रोजी परांडे जांभरूननजीक पुलावर शिवसेनेसह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

shivsena rasta roko agitation in washim
माटोंकार्लो कंन्स्ट्रक्शन विरोधात शिवसेनेने केले रास्ता रोको आंदोलन
author img

By

Published : Jun 24, 2021, 8:07 AM IST

वाशिम - माटोंकार्लो कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या चुकीच्या कामामुळे अपघात होत आहेत. या अपघातामध्ये मृत्यु झालेली महिला पोलीस व अनेक अपघातग्रस्तांच्या न्याय मागणीसाठी बुधवारी दि. 23 रोजी परांडे जांभरूननजीक पुलावर शिवसेनेसह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

माटोंकार्लो कंन्स्ट्रक्शन विरोधात शिवसेनेने केले रास्ता रोको आंदोलन

रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे अनेकांचे अपघात-

यावेळी पोलीस दलातील कार्यरत महिला पोलीस जया खराटे यांच्या कुटूंबाला न्याय मिळालाच पाहिजे. माटोंकार्लो कंपनीवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. मृत्युपावलेल्या कुटूंबांना तत्काळ मदत देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी लावून धरल्या. शिवसेना तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप मोरे यांनी आपल्या भाषणातून माटोंकार्लो कंपनीवर सडकून टिका करून आतापर्यंत माटोंकार्लो कंपनीच्या वाहनाने एक महिला व एक पुरूषाचा बळी घेतला. तर दुसरा बळी जया खराटे यांचा घेतला. रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे अनेकांचे अपघात होवून ते जखमी झाले. तर कंपनीचे टिप्पर रात्री-बेरात्री गौणखनिजाची ने-आण करीत आहे. नियम डावलून ही कंपनी काम करीत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने याची दखल घेवून त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करून सुटका -

यावेळी शिवसैनिक जया खराटे यांच्या निधनामुळे आक्रमक झाले होते. माटोंकार्लो कंपनीच्या कर्मचाऱ्याला आंदोलन स्थळी बोलवण्यात आले होते. त्यांनी मी नुकताच याठिकाणी रूजु झालो असल्याचे सांगितले. या ठिकाणी वाशिम नायब तहसिलदार पुरोहीत, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार झळके यांच्यासह पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. हेआंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनकर्त्यांना रास्ता रोको करताना पोलिसांनी तात्काळ अटक करून सुटका करण्यात आली.

हेही वाचा - वाशिममधील कोरोना बाधित लहान मुलांसाठी १०० खाटांची सज्जता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.