वाशिम - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर वाशिम-यवतमाळ मतदारसंघाच्या शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील नॅशनल हायवेची जवळपास 90 टक्के कामे ही पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी ही कामे राहिलेली आहेत. ती फॉरेस्ट किंवा काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तर काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तेथील काम थांबवलेले आहे. शिवसेनेने कुठल्याही कामात आडकाठी केली नाही, किंवा कोणतेही काम थांबवलेले नाही. गडकरी साहेबांकडे काहीतरी चुकीची माहिती गेली असावी, मी स्वतः गडकरी साहेबाना भेटून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार गवळी यांनी दिले आहे.
शिवसेनेची आडकाठी नाही.. केंद्रीय मंत्री गडकरींच्या लेटर बॉम्बवर खासदार गवळी यांचे उत्तर
'आमच्या रिसोडच्या शिवसैनिकाची जी ऑडियो क्लिप आहे, त्यामध्ये ते शिवसैनिक चांगले काम करावे, असे बोलत आहेत आणि त्या पाधिकाऱ्यांनी रिसोड शहरातील खड्डे स्वतः उभे राहून भरून घेतले आहेत. कोणीही काही अॅडियो क्लिप व्हायरल करत असतील याला काही अर्थ नाही, काही लोकांचे आमच्या विरोधात हे षड्यंत्र आहे. जाणून बुजून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गवळी यांनी केला.