ETV Bharat / state

शिवसेनेने गड राखला; काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरेंना भावना गवळींनी चारली परावभाची धूळ

भावना गवळी यांनी पाचव्यांदा विजय संपादन केला. त्यांनी काँग्रसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.

भावना गवळी
author img

By

Published : May 24, 2019, 5:48 PM IST

यवतमाळ - लोकसभेच्या यवतमाळ - वाशिम मतदार संघात महायुतीच्या भावना गवळी पाचव्यांदा विजयी झाल्या. भावना गवळींनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा तब्बल 1 लाख 17 हजार 939 मताने पराभव केला. गवळी यांना 5 लाख 42 हजार 98 , तर ठाकरे यांना 4 लाख 24 हजार 159 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण पवार 93228 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजप बंडखोर पी. बी. आडे 24449 तर प्रहारच्या वैशाली येडे पाचव्या क्रमांकावर राहिल्या.

आढावा घेताना प्रतिनिधी निलेश फाळके

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात सात पैकी पाच आमदार भाजप, एक शिवसेना तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. लोकसभा मतदार संघातील पुसद विधानपरिषद क्षेत्रांमध्ये आजपर्यंत काँग्रेसला मताधिक्य राहिले आहे. मात्र यावेळी भावना गवळी यांना जवळपास सहा हजाराची आघाडी मिळाली आहे. वाशिम विधानसभा क्षेत्रात 24 हजार 57, कारंजा मतदार संघात 3 हजार 634, राळेगाव मतदार संघात 28 हजार 192, दिग्रस मतदार संघात 18 हजार 5 42 तर सर्वाधिक यवतमाळ विधानसभा क्षेत्रातून 37 हजार 277 मतांची आघडी मिळाली आहे.

या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार, भाजपचे बंडखोर उमेदवार पी. बी. आडे, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली येडे यांच्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ माणिकराव ठाकरे यांच्या जुना मतदारसंघ असून यामध्येही माणिकराव ठाकरे माघारले आहेत. या मतदार संघात शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची चांगली पकड असल्याने याठिकाणी शिवसेनेला मताधिक्य प्राप्त झाले. राळेगाव विधानसभेमध्ये खासदार भावना गवळी यांना 28 हजार 192 मतांची लीड मिळाली.

Intro:शिवसेनेने गड कायम राखला
काँग्रेस दिग्जज माणिकराव ठाकरे यांचा पराभव
Body:यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ - भावना वाशिम मतदारसंघात शिवसेना - भाजप युतीच्या भावना गवळी एक लाख 17 हजार 939 मतांची आघाडी घेऊन पाचव्यांदा संसदेत निवडून येऊन मतदार संघात गड कायम राखला. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा तब्बल पराभव केला. गवळी यांना पाच लाख 42 हजार 98 तर ठाकरे यांना 4 लाख 24 हजार 159 मते मिळाली. बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण पवार 93228 मते घेेेऊन
तिस-या क्रमांकावर राहिले. भाजप बंडखोर पी.बी. आडे 24449 तर
प्रहारच्या वैशाली येडे पाचव्या क्रमांकावर राहिल्या. भावना गवळी यांना सहाही विधानसभा मतदारसंघातून मतांची आघाडी मिळाली.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सात पैकी पाच आमदार भाजपचे तर एक शिवसेनेचे तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. लोकसभा मतदारसंघातील पुसद विधानपरिषद क्षेत्रांमध्ये आजपर्यंत काँग्रेसला मताधिक्य राहिले आहे. मात्र यावेळी भावना गवळी यांना जवळपास सहा हजाराची मिळाली आहे. तर वाशीम विधानसभा क्षेत्रात 24 हजार 57, कारंजा मतदारसंघात 3 हजार 634, राळेगाव मतदारसंघात 28 हजार 192, दिग्रस मतदारसंघात 18 हजार 5 42 तर सर्वाधिक यवतमाळ विधानसभा क्षेत्रातून 37 हजार 277 मतांची आघडी मिळाली आहे.
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार, भाजपचे बंडखोर उमेदवार पी. बी. आडे, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली येडे यांच्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ माणिकराव ठाकरे यांच्या जुना मतदारसंघ असून यामध्येही माणिकराव ठाकरे माघारले आहे. या मतदार संघात शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची चांगली पकड असल्याने याठिकाणी शिवसेनेला मताधिक्य प्राप्त झाले.
राळेगाव विधानसभा मध्ये खासदार भावना गवळी यांना 28 हजार 192 मतांची लीड मिळाली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.