ETV Bharat / state

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे - पालकमंत्री शंभूराज देसाई - Shambhuraj Desai news

कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भविष्यातील कोरोना संसर्ग वाढीचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

shambhuraj desai said Citizens should follow the rules to prevent corona infection
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे - पालकमंत्री शंभूराज देसाई
author img

By

Published : Feb 18, 2021, 10:46 PM IST

वाशिम - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भविष्यातील कोरोना संसर्ग वाढीचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (ता. १८) आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री शंभूराज देसाई बोलताना...
पालकमंत्री देसाई म्हणाले, 'आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आपल्या जिल्ह्यात हा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करावे. प्रत्येक व्यक्तीने घरबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रमांना ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे. या मर्यादेतच समारंभ आयोजित करावेत. याठिकाणी कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.'
प्रतिबंधात्मक उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहावे. कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी सुरु करावी. जिल्ह्यात आढळणाऱ्या प्रत्येक कोरोना बाधिताच्या संपर्कातील किमान २० लोकांचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करावी. कोरोना बाधितांची वाढ लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आवश्यक सज्जता ठेवावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते, पोलीस अधीक्षक परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. तसेच कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.