ETV Bharat / state

वाशिममध्ये 17 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 187 वर - 17 new corona patient

वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी 17 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 187 वर पोहोचली.100 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

washim corona update
वाशिम कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 11, 2020, 9:02 AM IST

वाशिम- जिल्ह्यात शुक्रवारी 17 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामुळे रुग्णसंख्या 187 वर पोहोचली आहे. 3 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला.

17 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगरुळपीर शहरातील संभाजी नगर परिसरातील ४ वर्षीय मुलगी, ५४ वर्षीय महिला, सोनखास परिसरातील ३१ वर्षीय महिला, गवळीपुरा परिसरातील ३० वर्षीय , बढाईपुरा परिसरातील ४९ वर्षीय व्यक्ती अशा एकूण ५ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत.

कारंजा शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, आनंद नगर परिसरातील ५२ वर्षीय महिला व २ वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ०५ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच मालेगाव शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा परिसरातील ०३ आणि नागरतास रोड परिसरातील एका व्यक्तीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 187 वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 100 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 82 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.