वाशिम - जिल्ह्यात मागील तीन दिवसात समाधानकारक पाऊस पडला. या पावसामुळे वारा जहांगीर येथील संगमेश्वर प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. तसेच परिसरातील पाणीटंचाई बहुतांशी दूर झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन दशकांपासून निसर्गाच्या लहरीपणामळे पर्जन्यमानात कमालीची घट होत आहे. त्यामुळे दरवर्षी तालुक्यातील खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसतो आहे. तर रब्बीच्या क्षेत्रातही घट होत आहेत. वाशिम तालुक्यातील वारा जहांगीर चा संगमेश्वर प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पामुळे उमरा मोठा, वारा, देपुळ,बोरी, काजलांबा, मसला, धानोरा आणि मापारी या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पीक घेण्याकरिता चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.