ETV Bharat / state

रयत क्रांती संघटना अन् रासपचे शेतकऱ्यांसाठी जागरण-गोंधळ आंदोलन

author img

By

Published : Oct 22, 2020, 5:35 PM IST

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने आज (गुरुवार) तहसीलदार कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन केले.

आंदोलक
आंदोलक

वाशिम - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत करा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज (दि. 22 ऑक्टोबर) वाशिम तहसील कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रयत क्रांती संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

आंदोलक
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम तहसील कार्यालयासमोर जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाने मदत केली नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

हेही वाचा - शिरपूर येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये केळीचे झाड लावून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.