ETV Bharat / state

ऐन दुष्काळात ४ कि.मी. सायकल चालवून 'तो' भागवतोय माकडांची तहान - दुष्काळ

वाशिममधील पाणी टंचाईमुळे वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे.

रतन वानखेडे माकडांना अन्न आणि पाणी देताना
author img

By

Published : May 22, 2019, 1:28 PM IST

Updated : May 22, 2019, 3:46 PM IST

वाशिम - पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांना रोज भटकंती करावी लागते. हीच परिस्थिती वन्यप्राण्यांची आहे. मात्र, कारंजा तालुक्यातील काजना येथील रतन वानखेडे गेल्या अनेक वर्षांपासून माकडाची तहान भागविण्याचे काम करत आहेत.

पाणी वाहून नेताना रतन वानखेडे

वानखेडे हे स्वतः ४ किलोमीटर सायकल चालवून माकडांसाठी खाद्याची आणि पाण्याची व्यवस्था करतात. विशेष म्हणजे स्वतः भूमिहीन असूनही हमाली काम करुन ते आपला उदरनिर्वाह करतात. वन्यजीवांची सेवा करण्याच्या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Intro:ऐन दुष्काळातही सकाळी झोपेतून उठल्यानंतर माकडांची टोळी त्याची वाट पाहत असते.कारण त्या सर्वमाकडांसाठी रतन चार किलोमीटर सायकलने पाणी व स्वखर्चाने खाद्य त्यांच्या पर्यंत घेवून जातोय.

Body:वाशिम जिल्ह्यात यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून घोट भर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. हीच परिस्थिती वन्यप्राण्याची झाली आहे.मात्र कारंजा तालुक्यातील काजना येथील रतन वानखडे गेल्या अनेक वर्षांपासून माकडाची तहान भागविण्याचे कार्य अविरत करताना दिसून येत आहेत.

Conclusion:रतन वानखेडे हे स्वतः चार किलोमिटर वरून सायकलने पाणी व माकडाकरिता खाद्यची व्यवस्था करीत आहेत. विशेष म्हणजे स्वतः भूमिहीन असून हमाली काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रतन चा वन्यजीवांची सेवा करण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे......
Last Updated : May 22, 2019, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.