ETV Bharat / state

वाशिममध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजारो एकरातील पिकांची नासाडी, शेतकरी अडचणीत - वाशिममध्ये गारपीट

वाशिम जिल्ह्यात खरीपातील सोयाबीननंतर रब्बीत मोठ्या प्रमाणात कांदाबीज लागवड करतात. कांदाबीज काढणीला आले असताना काल रात्री गारपीटसह अवकाळी पावसामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपिटीने झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

rain-and-hailstorm-in-washim-district
वाशिममध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजारो एकरातील पिकांची नासाडी
author img

By

Published : Mar 20, 2021, 12:42 PM IST

वाशिम - जिल्ह्यात शुक्रवारी रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसासह गारपिटीने शिरपूर, चिखलीसह अनेक गावात गहू, हरभरा, कांदाबीज, पपई, टरबूज, केळीसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी -
जिल्ह्यात खरीपातील सोयाबीननंतर रब्बीत मोठ्या प्रमाणात कांदाबीज लागवड करतात. कांदाबीज काढणीला आले असताना काल रात्री गारपीटसह अवकाळी पावसामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपिटीने झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वाशिममध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजारो एकरातील पिकांची नासाडी..
वाशिम तालुक्यातील चिखली परिसरात रवींद्र गवळी यांची चिकू आणि आंब्याची फळबाग आहे. आंबा आणि चिकू विक्रीला आले असता काल रात्री झालेल्या गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

पपई, केळी फळपिकांचे नुकसान -
मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पपई, केळी, टरबूज पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात सुरुवातीला बोगस बियाणे त्यानंतर परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून अहवाल तयार करून शासनाला पाठविण्यात आला. मात्र अजूनही मदत मिळाली नाही, त्यातच आता अवकाळी पावसासह गारपिटीने झालेले नुकसान भरपाई केव्हा मिळेल, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

हेही वाचा -ब्रेकिंग... रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील घराडा कंपनीत स्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.