वाशीम : कोरोना संकटामुळे गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली पूर्णा-अकोला-पूर्णा ही पॅसेंजर रेल्वे अखेर मंगळवारी रुळावरून धावली. यामुळे वाशीम जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. वाशीममार्गे परराज्यात , तसेच राज्यातील इतर महानगरांत जाण्यासाठी दळणवळणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नाही. हळूहळू रेल्वे सेवा सुरू होत आहे. मात्र पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र ही पॅसेंजर सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनारक्षित पूर्णा-अकोला-पूर्णा ही पॅसेंजर डेमू रेल्वे मंगळवारपासून सुरू झाली आहे. गाडी क्रमांक 07773 ही पूर्णा ते अकोला गाडी सकाळी 7 वाजता पूर्णा येथून निघुन सकाळी 10 वाजता वाशीम मार्गे दुपारी 12.10 वाजता अकोला येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07774 ही अकोला-पूर्णा पॅसेंजर सायंकाळी 4 वाजता अकोला येथून निघून वाशीमला सायंकाळी 5.16 वाजता पोहचेल. या गाडीला हिंगोली ते अकोलादरम्यान नावलगाव, माळशेलू, कनेरगांव नाका, केकत उमरा, वाशीम, जऊळका, अमानवाडी, लोहगड, बार्शी टाकळी, शिवनी शिवापूर व अकोला असे थांबे आहेत.
हेही वाचा - कल्याण रल्वे स्थानकावरील थरारक प्रकार! एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनमुळे वाचले आजोबांचे प्राण