ETV Bharat / state

ऐकावं ते नवलच; लग्नासाठी सजूनधजून निघाला नवरदेव . . .पोलिसांनी चेकपोस्टवर अडवून लावलं लग्न - संचारबंदी

नंधाना येथील अरविंद उबाळेचा विवाह म्हैसमाळ येथील गोदावरी लांडगेसोबत ठरला होता. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा त्यांच्या लग्नालाही चांगलाच फटका बसला. आज नवरदेव म्हैसमाळ येथे लग्नासाठी जात असताना अनसिंग चेकपोस्टवर कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना अडवलं.

police
चेकपोस्टवर पोलिसांनी लावलेले लग्न
author img

By

Published : May 17, 2020, 7:08 PM IST

Updated : May 17, 2020, 8:37 PM IST

वाशिम - लग्न घटीका समीप आलेली. . . करवल्यासह वरबाप अन् वरमायचा उत्सह शिगेला पोहोचलेला. . त्यात सजून-धजून लग्नासाठी नवरदेव मोठ्या उत्साहात नवरीच्या गावाकडं निघाला . . . सोबत वऱ्हाड्यांचा ताफाही तितक्याच उत्सहात वेशीवरुन निघाला. मात्र धुमधडाक्यात लग्न करण्याच्या त्यांच्या स्वप्नावर पोलिसांनी पाणी फिरवलं. . . चेकपोस्टवर पोलिसांनी या वऱ्हाड्यांना अडवत नवरीलाही बोलावून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी सोशल डिस्टंन्सींग पाळत चेकपोस्टवरच नवरदेव-नवरीचे लग्न लावून दिलं. या नवदाम्पत्यांना पोलिसांनी जिजाऊची प्रतिमाही भेट दिली. त्यामुळे हे जगावेगळं लग्न जिल्हाभरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

ऐकावं ते नवलच; लग्नासाठी सजूनधजून निघाला नवरदेव . . .पोलिसांनी चेकपोस्टवर अडवून लावलं लग्न

त्याचं झालं असं, की वाशिम जिल्ह्यातील नंधाना येथील अरविंद उबाळेचा विवाह म्हैसमाळ येथील गोदावरी लांडगेसोबत ठरला होता. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा त्यांच्या लग्नालाही चांगलाच फटका बसला. आज नवरदेव म्हैसमाळ येथे लग्नासाठी जात असताना अनसिंग चेकपोस्टवर कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना अडवलं. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी यावेळी केलं. त्यामुळे संचारबंदीत जिल्ह्याची सीमा न ओलांडता चेकपोस्टवरच लग्न उरकरण्याची पोलिसांनी वऱ्हाड्यांसह नवरदेवाला समज दिली. कोरोनाचा धोका पत्करल्यापेक्षा चेकपोस्टवर विवाह करण्यास नवरदेव अरविंदही तयार झाला. त्यानंतर पोलिसांनी नवऱ्या मुलीला बोलावत चेकपोस्टवर आदर्श लग्न करण्यात आलं. यावेळी अनसिंग पोलिसांनी नवीन जोडप्यांना जिजाऊची प्रतिमा भेट देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे सर्वच सार्वजनिक सण उत्सवांसह लग्न समारंभांवरही बंदी अली आहे. त्यामुळे अनेक नियोजित लग्न प्रभावित झाली आहेत. परिस्थितीचे भान ठेवून अनेक जण साधेपणाने लग्न आटोपून घेत आहेत. काळाची गरज लक्षात घेऊन अनेक जण सामाजिक अंतर पाळून अतिशय साधेपणाने लग्नविधी उरकून घेत आहेत. असाच हा आदर्श विवाह अनसिंग चेक पोस्टवर पोलिसांनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत घडवून आणल्यानं जिल्ह्यात या विवाहाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Last Updated : May 17, 2020, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.