वाशिम - जिल्ह्याची निर्मिती होऊन 21 वर्षे उलटली. मात्र, पांगरी महादेव गावाला ग्रामपंचायतच मिळाली नाही. त्यामुळे गावात विकासकामे होत नाहीत. गावाला ग्रामपंचायतचा दर्जा द्या किंवा गट ग्रामपंचायतला जोडा, अशी मागणी देखील केली. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
अकोला जिल्ह्यातून विभाजन होऊन 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पांगरी महादेव हे बार्शीटाकळी तालुक्यात होते. मात्र, विभाजन झाल्यानंतर मंगरुळपीर तालुक्याला जोडले गेले. पांगरी महादेव गावाला मंगरुळपीर तालुक्यात जोडल्या गेले. मात्र, तेव्हापासून गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली नाही. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा दाखला मिळत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेताना अनेक अडचण येतात.
हे वाचलं का? - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
ग्रामपंचायत नसल्याने गावात विकास होत नाही. पाणी समस्या घरकुल मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा. अन्यथा आम्ही कुठल्याच निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुढारी आश्वासन देत प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन नियोजनात मग्न आहे. मात्र, या गावाकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ मिळेल का? त्यातून गावाला ग्रामपंचायत मिळेल का? हाच प्रश्न उपस्थित होतो.
हे वाचलं का? - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता