ETV Bharat / state

रिसोड विधानसभा आढावा - मतदारसंघात तिरंगी लढतीने येणार रंगत! - risode news

वाशिम जिल्ह्यातील एकमेव बंद अवस्थेत असलेला बालाजी साखर कारखाना नव्याने सुरू केल्यास निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या येथील मजुरांच्या हाताला काम मिळून खरीप हंगामानंतर त्यांच्या भटकंतीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. याच तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बेरेजेस उभारल्या गेल्यास सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होवू शकते. या कामांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास येथील मतदार पसंती देणार असल्याचे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

रिसोड विधानसभा आढावा
author img

By

Published : Sep 19, 2019, 5:03 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ... हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत 'मोदी लाट' थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखत अमित झनक यांना 12 हजार मतांनी विजयी केले होते.

हेही वाचा - 'या' ७५ मतदारसंघावर आहे शिवसेनेची मदार; ८० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य

काहीसा अपवाद वगळता मागील 3 पिढ्यापासून झनक कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातील यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. यावेळी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे कडवे आव्हान असून यामुळे तिरंगी लढत बघण्यास मिळणार, यात मात्र शंका नाही.

परिसिमन आयोगाकडून करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील असलेली विधानसभा मतदारसंघाची संख्या 4 वरून 3 करण्यात आली. पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करण्यात येवून नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात २ वेळा भाजपचे विजयराव जाधव यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा - शिवसेनेचं ठरलं! युती तुटण्याचे " हे " ठरणार निमित्त ?

वाशिम जिल्ह्यातील एकमेव बंद अवस्थेत असलेला बालाजी साखर कारखाना नव्याने सुरू केल्यास निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या येथील मजुरांच्या हाताला काम मिळून खरीप हंगामानंतर त्यांच्या भटकंतीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. याच तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बेरेजेस उभारल्या गेल्यास सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होवू शकते. या कामांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास येथील मतदार पसंती देणार असल्याचे चित्र या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय संवेदनशील मतदारसंघ म्हणजे रिसोड. पूर्वी या मतदारसंघाची मेडशी अशी ओळख होती. मात्र, 2009 मध्ये या मतदारसंघाला 'रिसोड' ही नवी ओळख मिळाली. या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा अन् झनक घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. रामराव झनक, सुभाष झनक यांच्यानंतर आता अमित झनक हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

हेही वाचा - शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर युती तुटेल - खासदार संजय राऊत

या मतदारसंघातील विकासाचा पाढा वाचताना आमदार झनक यांनी लघु सिंचन प्रकल्प, वीज उपकेंद्र, वाशिममध्ये जिल्हा रुग्णालय, मालेगाव बायपास रोड, रस्ते बांधणी असे विविध विकासकामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केले आहे. याच विकासकामावर आपण पुन्हा निवडणूक जिंकू, असा विश्वास झनक यांनी व्यक्त केला आहे .विद्यमान आमदारांकडून विकासकामांचा दावा केला जात असला तरी रिसोड विधानसभा मतदारसंघातील काही समस्या आजही जैसे थे आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, सिंचन प्रकल्प, एमआयडीसीची दुरावस्था, सहकारी संस्था, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बालाजी साखर कारखाना असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. विकासपातळीवर या मतदारसंघाची ही अवस्था असली तरी राजकीयपटलावर येथे हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची लाईन पहायला मिळत आहे. रिसोड मतदारसंघाचा विकास खुंटलेला असताना राजकारण मात्र निवडणूक लागण्यापूर्वीच तापू लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व युतीत चुरस पहायला मिळणार आहे.

रिसोड विधानसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. आमदार अमित झनक येथून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, या दोन तालुक्यातील नगरपालिका व पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. या मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक, नकुल देशमुख, भाजपकडून माजी आमदार विजय जाधव, राजू पाटील राजे, श्याम बडे, गोपाल पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप जाधव, प्रा. प्रशांत गोळे,, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बाबाराव खडसे तर स्वाभिमानी संघटनेकडून दामू इंगोले, युतीला जागा सुटली तर शिवसेनेकडून विश्वनाथ सानप, शिवसंग्रामकडून विष्णुपंत भुतेकर हे इच्छुक आहेत.

2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांना 70 हजार 939 मते पडली होती. तर, भाजप पराभूत उमेदवार विजय जाधव यांना 54 हजार 233 मते पडली असून अमित झनक यांचा 16 हजार 708 मतांनी विजय झाला होता.

निवडणुकीचे संभाव्य चित्र

या मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होण्याऐवजी तिरंगी लढतीचे चित्र समोर येत आहे. भाजपमधून भारिपमध्ये आलेले वामन सानपमुळे 5 टक्के आदिवासी व 12 टक्क्यांच्यावर वंजारी मते व वंचित बहुजन आघाडी पक्षाची मते ग्राह्य धरल्यास लढतीत चुरस येण्याची शक्यता आहे.

Intro:
आढावा विधानसभा ( वाशिम )

रिसोड मतदारसंघात तिरंगी लढत

अँकर : वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे रिसोड विधानसभा मतदारसंघ... हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा परंपरागत गड समजला जातो 2014 च्या लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या पोटनिवडणुकीत 'मोदी लाट' थोपवत काँग्रेसने आपली जागा कायम राखत अमित झनक यांना 12 हजार मतांनी विजयी केले होते तर 2014 च्या विधानसभा च्या निवडणूक मध्ये विजय संपादन केले होते..काहीसा अपवाद वगळता मागील 3 पिढ्या पासून झनक कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातील यावेळची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे यावेळी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी चे कडवे आव्हान असणार असून यामुळे तिरंगी लढत बघण्यास मिळणार यात मात्र शंका नाही....

व्हिओ : परिसिमन आयोगा कडून करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशीम जिल्ह्यातील असलेली विधानसभा मतदारसंघाची संख्या 4 वरून 3 करण्यात आली. पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करण्यात येवून नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वापार कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणारया या मतदारसंघात २ वेळा भाजपचे विजयराव जाधव यांनी प्रतिनिधित्व केले आहे...

व्हिओ : वाशीम जिल्ह्यातील एकमेव बंद अवस्थेत असलेला बालाजी साखर कारखाना नव्याने सुरु केल्यास निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या येथील मजुरांच्या हाताला काम मिळून खरीप हंगामा नंतर मजुराच्या भटकंतीचा प्रश्न मार्गी लागू शकतो... याच तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बेरेजेस उभारल्या गेल्यास सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होवू शकते या कामाना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारास येथील मतदार पसंती देणार असल्याचे चित्र या मतदारसंघात पहावयास मिळत आहे..

व्हिओ : वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक राजकीय संवेदनशील मतदारसंघ म्हणजे रिसोड... पूर्वी या मतदारसंघांची मेडशी अशी ओळख होती.... मात्र 2009 मध्ये या मतदारसंघाला 'रिसोड' ही नवी ओळख मिळाली.... या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे..हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा अन झनक घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो... रामराव झनक,सुभाष झनक यांच्यानंतर आता अमित झनक हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात...

व्हिओ : या मतदारसंघातील विकासाचा पाढा वाचताना आमदार झनक यांनी लघु सिंचन प्रकल्प ,वीज उपकेंद्र,वाशिममध्ये जिल्हा रुग्णालय,मालेगाव बायपास रोड,रस्ते बांधणी असे विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केलीय... आणि याच विकासकामावर आपण पुन्हा निवडणूक जिंकून येवू असा विश्वास झनक यांनी व्यक्त केला आहे....विद्यमान आमदारांकडून विकासकामांचा दावा केला जात असला तर रिसोड विधानसभा मतदारसंघातील काही समस्या आजही जैसे थे आहेत...

व्हिओ end : ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था,सिंचन प्रकल्प रखडले,एम.आय.डी.सी.ची दुरवस्था ,सहकारी संस्था ,ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बालाजी साखर कारखाना असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत... विकासपातळीवर या मतदारसंघाची हि अवस्था असली तरी राजकीयपटलावर इथं हलचालींना वेग आला आहे... या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची लाईन पहायला मिळत आहे....रिसोड मतदारसंघाचा विकास खुंटलेला असतांना राजकारण मात्र निवडणूक लागण्यापूर्वीच तापू लागले आहे..आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस,वंचित बहुजन आघाडी व युतीत चुरस पहायला मिळणार आहे.....

बाईट : अमित झनक ,आमदार काँग्रेस
बाईट : विजय जाधव ,माजी आमदार भाजप
बाईट : वामन सानप (वंचित बहुजन आघाडी)

◆रिसोड विधानसभा मतदारसंघ◆

हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. आमदार अमित झनक येथून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, या दोन तालुक्यातील नगर पालिका व पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. या मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबीत आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक, नकुल देशमुख, भाजपकडून माजी आमदार विजय जाधव,राजू पाटील राजे, ,श्याम बडे ,गोपाल पाटील ,वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप जाधव, प्रा. प्रशांत गोळे, वामन सानप,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बाबाराव खडसे तर स्वाभिमानी संघटनेकडू दामू इंगोले,युती जागा सुटली तर शिवसेनेकडून विश्वनाथ सानप,शिवसंग्राम कडून विष्णुपंत भुतेकर हे इच्छुक आहेत....

2014 मध्ये रिसोड विधानसभा काँग्रेस चे अमित झनक याना 70939 मते पडली होती तर भाजप पराभूत उमेदवार विजय जाधाव यांना 54233 मते ,अमित झनक 16708 मतांनी विजय झाला होता...

काँग्रेस आमदार अमित झनक यांनी भाजप चे विजय जाधव याना हरविले होते तर शिवसेना या मतदार तिसऱ्या नंबर होती राष्ट्रवादी व मनसे या दोन्ही पक्ष्याची या मतदारसंघात डिपॉझिट जप्त झाल होत...

◆आगामी निवडणुकीचे संभाव्य चित्र◆

या मतदार संघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होण्याऐवजी तिरंगी लढतीचे चित्र समोर येत आहे.भाजप मधून भारिप मध्ये आलेले वामन सानप मुळे 5 टक्के आदिवासी व 12 टक्क्याच्यावर वंजारी मते वंचित बहुजन आघाडी पक्षाची मते ग्राह्य धरल्यास लढतीत येण्याची शक्यता आहे.....
Body:रिसोड मतदारसंघात तिरंगी लढत Conclusion:रिसोड मतदारसंघात तिरंगी लढत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.