वाशिम- संत्रा तोडणीच्या कामासाठी शेजारच्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील पेडगावात आलेली २० मजूर कुटुंब व त्यांची चिमुकली मुले असे एकूण ३१ जण लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. ठेकेदाराने त्यांना वाऱ्यावर सोडल्याने उपासमारीची वेळ या कुटुंबावर ओढवली होती. मगरुळपीर येथील तहसील कार्यालयाने त्यांच्या जेवणाची सोय केली.
ठेकेदाराने या मजुरांना वाऱ्यावर सोडल्याने या सर्वांवर उपासमारीची पाळी आली. हे सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील मानशू येथील आहेत. पोटापाण्यासाठी रोजगारानिमित्त ते सतत भटकंती करतात. हे मजूर संत्रा तोडणीच्या कामासाठी घरदार सोडून मुलाबाळांसह वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे दाखल झाले होते.
हातावरच पोट घेऊन ठिकठिकाणी फिरणाऱ्या मजुरांवर वाईट वेळ आली होती. मात्र, मंगरुळपीर तहसीलदार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांना शेतशिवारातच दोन वेळेच्या जेवणाची सोय करून त्या मजुरांना आधार दिला देण्यात आला.