वाशिम - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. अनेकांची महत्त्वाची कामे यामुळे थांबली आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं लग्नसमारंभ अडचणीत आले आहेत. मात्र, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत एक विवाह सोहळा संपन्न झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील येवती येथील सतीश शिंदे यांचा विवाह मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील अश्विनी कव्हर या मुलीशी ठरला होता. दोन्ही परिवाराने चर्चा करून सहमतीने दोन्ही कुटुंबातील पाच-पाच सदस्यांनी एकत्रीत येत असेगाव येथील उडीतला महादेव मंदिरात साध्या पद्धतीने लग्न उरकून घेतले. असे लग्न करुन त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.