वाशिम - जिल्ह्यातील मेडशी ऊर्ध्व मोर्ना प्रकल्पाच्या पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. गोकसावगी येथील लालमन उत्तम काळे (वय ४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रकल्पाच्या किनाऱ्यावरून जनावरे घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली.
ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. यामुळे शोधकार्य थाबंवण्यात आले. साकळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. या घटनेने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.