वाशिम - मानोरा तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हेही वाचा - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तयारीत चिमुकल्यांचा हातभार
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, तूर, कापूस या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान विभागाने पाच जानेवारीपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.