वाशिम- एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मात्र अजुनही आपल्या जल्लोशातच मग्न असल्याचे दिसून आले. आज (शुक्रवारी) वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची लाडुतूला करण्यात आली.
अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचीत खासदार तथा राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जल्लोशाचा धडका लावत पुन्हा ऐकदा लाडुतूला करत दुष्काळाबाबत परिस्थितिबाबत असंवेदनशीलता दाखवली आहे. एकीकडे महाराष्ट्रात नेते मंडळी दुष्काळ दौरे करत आहेत. तर दूसरीकडे मात्र भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आपली लाडुतूला करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आले. त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी ज्या मतदारांनी आपल्याला सत्तेत पाठविले त्यांचा विचार करावा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.