वाशिम - जिल्ह्यात मतदानला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण तीन मतदारसंघात 9 लाख 58 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रिसोड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अमित झनक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करावे असे, आवाहन अमित झनक यांनी केले.
वाशिम जिल्ह्यातील 1 हजार 52 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महिलांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन या प्रमाणे जिल्ह्यात 6 ‘सखी मतदार केंद्रे’ स्थापन केली आहेत. निवडणुकीसाठी सुमारे 4 हजार 636 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.