वाशिम- मानोरा ते मंगरुळपीर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. रस्त्यावर मुरुमाऐवजी लाल मातीचा वापर केला जात आहे. पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस पाटील आणि नागरिकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन कामाच्या चौकशीची मागणी केली आहे.
हेही वाचा- 'व्हॅलेंनटाईन डे'निमित्त मावळच्या गुलाबाची मागणी वाढली, १० दिवसात ८० लाखांचे उत्पन्न
गावातील नागरिकांनी कामात सुधारणा व्हावी यासाठी सरजॉन इन्फ्रॉस्टक्चर्स प्रा.लि. अहमदाबाद या कंपनीकडे तक्रार केली होती. मात्र, कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी तहसीलदारामार्फत नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.