वाशिम - महाराष्ट्र विधानसभेच्या रिसोड मतदारसंघात आज अटीतटीची लढत झाली. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित झनक यांचा सलग तिसऱयांदा विजय झाला. यावर बोलताना ते म्हणाले, की क्रिकेटच्या खेळात हॅट्रिक महत्त्वाची असते, तशीच राजकारणातही आहे. मात्र, या हॅट्रिकपेक्षाही मी विकेट कोणाची घेतली आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी इमरान खान यांनी..
वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रिसोड मतदारसंघातून अमित झनक हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. दुपारपर्यंत याठिकाणी अपक्ष उमेदवार अनंत देशमुख हे आघाडीवर होते. मात्र, 14व्या फेरीनंतर अमित हे 2,732 मतांनी पुढे आले. त्यानंतर संध्याकाळी 9 ईव्हीएममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रिसोडमधील चित्र अधिक अस्पष्ट झाले होते. तेव्हा झनक हे 2,200 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर थेट त्यांच्या विजयाची बातमी कानावर पडली, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : वाशिम निकाल : रिसोड मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक विजयी