वाशिम - कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात उद्या दुपारी 12 वाजेपासून ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. त्यामुळे वाशिममध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तर पेट्रोल पंपही बंद राहणार असल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याच दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टस्टिंगचा फज्जा उडाल्याच चित्र बघावयास मिळाले. दुसरीकडे उद्या मार्केट पूर्णतः बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी किराणा, भुसार खरेदी करितादेखील गर्दी केली आहे.
दुपारी 12 वाजेपासून कडक निर्बंध लागू -
लॉकडाऊन काळात सकाळी 7 ते 11 पर्यंत पार्सल सुविधा होती. मात्र, उद्या दुपारी 12 वाजेपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दवाखाने मेडिकल वगळता सर्वकाही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच शिवाभोजन थाळी घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही कसे लाभार्थी शोधायचे, असा प्रश्न शिवाभोजन चालकांसमोर पडला आहे. जिल्हा प्रशासनाने कमी वेळ द्यावा, मात्र पार्सल सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवभोजन चालकाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकच्या आईच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, जागीच मृत्यू