वाशिम - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यानुसार बंजारा समाजाचे नेते वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडणे हे योग्य नसून, याची सखोल चौकशी व्हावी आणि नंतर कारवाई करावी तसेच पूजा चव्हाण या तरुणीला न्याय मिळावा, अशी मागणी पोहरादेवी येथील धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांचे चिरंजीव भक्तराज महाराज आणि महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे.
सखोल चौकशीची मागणी -
यावेळी त्यांनी पूजा चव्हाण यांना श्रद्धांजली देत तिला तपास करून योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र, त्यापूर्वी बंजारा समाजाला बदनाम करू नये, असे मत वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील संत रामराव महाराज यांचे नातू धर्मपिठाधिशवर बाबूसिंग महाराज यांचे चिरंजीव यांनी व्यक्त केले आहे.पूजा चव्हाण या युवतीचे आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेमध्ये एका राजकीय नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणालाही बदनाम करू नये, असे मतही यावेळी भक्तराज महाराज यांनी व्यक्त केलंय.
भाजपकडून शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या आत्महत्येमागे महाविकास आघाडीमधील एक मंत्री असल्याचे वारंवार सांगितले जात होते. मात्र, हा मंत्री कोण आहे, याचा उलगडा होत नव्हता. यादरम्यान भाजपने पहिल्यांदाच जाहीरपणे शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एका बड्या मंत्र्याचे नाव येत आहे समोर
बीडच्या परळी येथील तरुणी पूजा चव्हाण प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे, मात्र तरीही पोलिसांकडून अद्याप कारवाई केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पोलीसांनी अद्याप कारवाई का केली नाही, याचं कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष