वाशिम - शहरातील सिव्हिल लाईन मार्गावर एका शासकीय वसाहती बाजूला स्त्री जातीचे नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले. अज्ञात अर्भक हे अंदाजे एक दिवसाचे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नवजात बाळाला ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
शहरात नवजात अर्भक आढळून आल्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अकोला-हिंगोली महामार्गावरील पुसद नाका परिसरात अंदाजे 3 दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. त्यानंतर वाशिम पोलिसांनी या नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अर्भकाला बेवारस टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध वाशिम शहर पोलीसांनी घेतला आणि अर्भकाच्या मातेला ताब्यात घेतले होते.
वाशिमच्या सिव्हिल लाईन परिसरात आढळले एका दिवसाचे नवजात अर्भक - वाशिममध्ये अर्भक आढळले
वाशिमच्या शासकीय वसाहतीच्या बाजूला नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळले. हे अर्भक स्त्री जातीचे असून पोलिसांनी अर्भकाला रुग्णालयात दाखल केले आहे.