वाशीम - शहरातील श्री बाकलीवाल विद्यालयात सोमवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखूची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. बाकलीवाल विद्यालयातील छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी अनेक तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी केली.
हेही वाचा... राज्यातील शाळांमध्ये होणार व्यसनमुक्तीसाठी 'तंबाखूची होळी'
विद्यालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त चित्रकला आणि पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यासोबतच तंबाखूमुक्त शाळेचा संकल्प करण्यात आला. यावेळी तंबाखूजन्य पदार्थाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेतील मुलांना व्यसनमुक्तीचे संस्कार शाळेत मिळत असून विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू व्यसन सोडण्याचे फायदे सांगण्यात आले.
हेही वाचा... "शरद पवार अजूनही तरुण आहेत, २०२४ ला पंतप्रधान होऊ शकतात"
दरवर्षी भारतात 18 लाख लोक तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने मरण पावतात.