वाशिम - शेतकऱ्यांना सुधारित कपासी लागवडीविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने 'सुधारीत कापूस प्रकल्प यंत्रणा' अर्थात 'बीसीआय'च्या वतीने वाशिम जिल्ह्यातील उंबडा बाजार येथील शेतकऱ्यांना कपाशी पिकाबाबत सापशिडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सापशिडीव्दारे मातीपरिक्षण, पेरणी सोबत देण्यात येणाऱ्या खतांचा फायदा, शेणखत मात्राची शिफारस, पाण्याची ओल सोडून पाणी देणे, सूक्ष्म ठिबक पध्दतीचा वापर, कपासीवरील कीटकनाशकाची फवारणी, किट वापरणे, जैविक कीटकनाशकाचा वापर, पिकांतील फेरबदल आदी विषयांवर सापशिडीच्या माध्यमातून मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.