वाशिम- प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील ग्रामसेवकांनी मुंडन आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संतापलेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले आहे.
हेही वाचा- बनाबट पोलिसांनी पकडली बनावट दारू, चोरावर मोर ठरले पोलीस
ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या होत्या. त्यासाठी ग्रासेवकांनी २२ तारखेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कले. शासनाकडून त्यांची कोणतीच मागणी पूर्ण न केल्या गेल्याने आज संतप्त झालेल्या ग्रामसेवकांनी मंगरुळपीर पंचायत समितीसमोर सामूहिक मुंडन करीत शासनाचा निषेध केला. शासनाने मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास यापुढे जेलभरो आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.