ETV Bharat / state

वाशिममध्ये माजी सरपंचाची दगडाने ठेचून हत्या, तिघांना अटक - वाशिम लेटेस्ट न्यूज

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून माजी सरपंच कैलास गायकवाड हे दुचाकीवरून आपल्या गावी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

washim crime news  washim latest news  वाशिम लेटेस्ट न्यूज  वाशिम क्राईम न्यूज
मृत माजी सरपंच कैलास गायकवाड
author img

By

Published : Sep 2, 2020, 9:20 AM IST

Updated : Sep 2, 2020, 1:19 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील माजी सरपंचांची मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. कैलास गायकवाड, असे मृताचे नाव असून ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वाशिममध्ये माजी सरपंचाची दगडाने ठेचून हत्या, तिघांना अटक

कैलास गायकवाड हे 31 ऑगस्टच्या रात्री दुचाकीने शिरपूरवरून दुधाळा येथे जात होते. त्याचवेळी मालेगाव-रिसोड महामार्गावरील दुधाळा फाट्यानजीक असलेल्या हॉटेलजवळ त्यांची तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली आणि त्यांचा मृतदेह हॉटेलपुढील नाल्यामध्ये टाकून दिला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवनकुमार बनसोड यांनी वेगाने तपास सुरू केला. घटना उघडकीस आल्यानंतर काही तासातच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

हत्येपूर्वी कैलास गायकवाड यांनी शिरपूर येथे सायंकाळी भाजीपाला आणि दूध घेतले होते. त्यानंतर ते आपल्या गावी दुधाळा येथे जात असताना कट रचून पंढरी देवबा गायकवाड, शंकर उर्फ सुनील भगवान साखरे, हरिभाऊ आनंदा गायकवाड या तिघांनी एका हॉटेल जवळ त्यांना बोलवले. मनात राग असलेल्या या तिघांनी अतिशय निर्दयीपणे धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून कैलास गायकवाड यांना ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Last Updated : Sep 2, 2020, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.