वाशिम - जिल्ह्यातील असेगाव येथे आज दुपारच्या सुमारास शार्टसर्किटमुळे साईंश्री इलेट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली. या आगीमुळे गावातील नागरिकांची एकच धावपळ उडाली असून आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच गावकरी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत दुकानामधील साहीत्य जळून खाक झाले. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून आगीच्या घटना रोज घडत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.