ETV Bharat / state

पोहरादेवी गर्दी प्रकरणी हजारोंवर गुन्हे दाखल; वनमंत्री राठोडांसह महंतांचे नाव नाहीच

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांने शक्तीप्रदर्शन केल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज होते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या भेटीनंतर ठाकरे यांनी वाशिम जिल्हा प्रशानसास पोहरादेव प्रकरणी चौकशी करत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

pohradevi
वनमंत्री राठोडांसह महंतांचे नाव नाहीच
author img

By

Published : Feb 25, 2021, 8:54 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनात त्यांचे समर्थक कोरोनाचे नियम असताना हजारोच्या संख्येने जमा झाले होते. त्यानंतर राठोड यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे नारादी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीच्या आदेशान्वये पोलिसांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या सुमारे 10 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र यामध्ये पोहरादेवी येथील महंतांचे आणि खुद्द वनमंत्री संजय राठोड यांच्या नावाचाच समावेश नाही.

पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले वन मंत्री संजय राठोड हे पंधरा दिवस नॉटरिचेबल होते. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथील महंतांनी त्यांना पोहरादेवी येथे दर्शनासाठी निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाला मान देऊन वन मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले, मात्र त्यांच्या समर्थनाकरिता हजारोच्या संख्येत त्यांचे समर्थक पोहरादेवी येथे जमा झाले.

पोलीस प्रशासनाकडून महंतांना केल्या होत्या सूचना-

संजय राठोड यांचा दौरा जाहीर होताच पोलिसांनी येथील पोहरादेवीच्या महंतांना कोरोनाचे नियम पाळण्याचे सूचित केले होते. तसेच जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगत कार्यक्रमासाठी फक्त पन्नास लोकांची उपस्थिती ठेवण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर ५० पेक्षा जास्त लोकांनी या कार्यक्रमात येऊ नये यासंदर्भात नोटीसही बजावली होती. मात्र या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने वनमंत्री संजय राठोड यांचे समर्थक पोहरादेवी येथे दाखल झाले होते.

या सर्व प्रकारानंतर विरोधकांकडून टीका झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांने शक्तीप्रदर्शन केल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज होते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या भेटीनंतर ठाकरे यांनी वाशिम जिल्हा प्रशानसास पोहरादेव प्रकरणी चौकशी करत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाचे वतीने कोरोनाचे नियम मोडणाऱ्या वन मंत्री संजय राठोड यांच्या 10 हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे ही गर्दी जमा झाली त्यांच्यावर अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.