ETV Bharat / state

पावसामुळे वाशिम बाजार समितीमधील शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

सोयाबीन भिजल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाली. २० हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन बाजार समितीत विक्रीला आले होते. मात्र, पावसामुळे सोयाबीन ओली झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

soybean sale Washim Market Committee
सोयाबीन भिजल्याचे दृश्य
author img

By

Published : May 13, 2020, 8:15 PM IST

वाशिम- वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा विक्रीला आलेले सोयाबीन भिजले आहे. आज अचानक सोयाबीनची आवक वाढली. त्यामुळे, ओट्यावर शेतमाल बसत नसल्याने शेतकऱ्यांना उघड्यावर शेतमाल ठेवावा लागला, परिणामी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने दीड हजार पोती सोयाबीन पाण्यात भिजले.

पावसात भिजत असलेल्या सोयाबीनचे दृश्य

आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक झाली. २० हजार क्विंटलच्यावर सोयाबीन बाजार समितीत विक्रीला आले होते. मात्र, पावसामुळे सोयाबीन ओली झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा- कारंजा येथील डॉक्टरसह पाच व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.