वाशिम : दुष्काळामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामूळे यावर्षी पीकविमा मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी कारंजा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या तीव्र दुष्काळामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामूळे यावर्षी पीकविमा कंपनीने मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना दिली पाहिजे. तसेच कर्जमाफी व पीककर्जाविषयी होत असलेली बँकेची दिरंगाई कुठेतरी थांबली पाहिजे. या सर्व मागण्यांसाठी शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी शेतकऱ्यांसह उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.