वाशिम - दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत असल्याने शेतीचे काम ट्रॅक्टरने केली जात आहेत. मात्र कपाशी डवरणीसाठी ट्रॅक्टर चालत नसल्याने मानोरा तालुक्यातील भुली येथील विष्णू वारे या शेतकऱ्याने आपल्या दुचाकीला डवरे बांधून डवरणी सुरू केली आहे.
शेती कमी असल्यामुळे बैलजोडी विकत घेऊन शेती करणे कठीण होते. भाड्याने बैलजोडी वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यात मजुरांची टंचाईचा परिणाम उत्पादनावर होते. शेवटी त्याने शक्कल लढवून दुचाकीवर डवरणी करण्याचे ठरवले.
राज्यात काही ठिकाणी सायकलच्या माध्यमातून शेती करता येते, अशी माहिती त्याने मिळविली. सायकलऐवजी दुचाकीचा वापर करुन गाडीलाच शेती अवजारे जोडण्याची कल्पना त्याच्या मनात रुजली. त्यामुळं त्याने केलेले जुगाड शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असून, बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना याचा उपयोग होणार आहे.